Untitled
Untitled
ती लहानपणापासूनच चुणचुणीत होती, आनंदी, खेळकर, उत्साहाचा झरा होती ती. वडील गावातील पोष्ट चालवायचे. एकाच
माणसाने पत्र स्विकारायची, विभागायची, शिक्के मारायचे, पाठवायची, लोकांचे पैसे स्विकारायचे, पासबुकात नोंदी करून
द्यायच्या, तेव्हा गावातील पोस्ट ऑफिस अशीच असायची.वडिलांना पोष्टाच्या कामात मदत करता करता अवघ्या सोळाव्या
वर्षी ती पोष्ट एकटीने चालवू लागली. कोकणातील एका छोट्या खेडग
े ावातील ती मुलगी. गावाजवळील तीन किलोमीटरवर
असलेल्या शाळे त रोज चालत जाऊन येऊन कायम प्रथम क्रमांकाने येऊन दहावी पूर्ण केलेले. घरातील परीस्थितीमुळे पुढे
शिक्षणाची संधी नाहीं मिळाली पण मिळाली असती तर ......
म्युन्सिपाल्टीच्या निवडणूका लागल्या.वॅार्डातील उमेदवारी आणि नगराध्यक्षपद स्त्री राखीव पडले. खरतर त्यालाच उभं राहायचं
होतं, पण ते शक्य होत नाही हे पाहताच तो तिला म्हणाला तूच उभी राहा. घरातल्या सगळ्यांनी तीला भरीस घातले. तिचा
नवरा तीला म्हणाला, चल, उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे . तिच्या मनात आले हे म्हणजे असे झाले कि, आधी
पक्ष्याची पिसे उपटून काढायची आणि त्याला उड म्हणायचे.........तिने उचल खाल्ली, मोठ्याने म्हणाली “चला”, मग हळूच
पुटपुटली, “हीच ती वेळ, हाच तो क्षण, त्याच उखडलेल्या पिसाच्या काडीने, नव्याने श्री गणेशा गिरवण्याची ----
ती अडाणी नव्हती राजकारणाचे क्षेत्र घाणीने किती बरबटलेले आहे याची तिला पूर्ण कल्पना होती. संधी आयुष्यात एकदाच
मिळते यावर तिचा पक्का विश्वास. आलेली संधी घ्यायचीच तिने ठरवले.. वॅार्डात ती भरघोस मतांनी निवडून आली. नव-याने
तिला नगराध्यक्ष पदासाठी उभी केली तिथेही ती भरघोस मतांनी निवडून आली. आजपर्यंत त्याच्या जनसंपर्क कार्यात
त्याच्याबरोबर शोभेची बाहुली म्हणून वावरलो एवढाच काय तो आपला जनसंपर्क , त्यामुळे हा विजय आपला नाही आपल्या
नव-याचा आहे याची तिला पूर्ण कल्पना होती. पण मनात एक खण ु गाठ पक्की होती आपलं स्वत:च अस्तित्व सिद्ध
करायचंच... (© AG)
पोहायला येत नसताना पाण्यात तर ती उतरली होती, नाका तोंडात थोड पाणी जाणारच, हात पाय मारून तर बघू असा
विचार तिने केला. सुरुवातीला नव-यामुळे हि खुर्ची मिळाली असल्याने कारभारातील त्याचा हस्तक्षेप सहन करत लोकांच्या
अपेक्षा पूर्ण करणे हि तारे वरची कसरत होती. ती आपले सहकारी नगरसेवक , नवरा , मुख्याधिकारी, कर्मचारी यांच्याशी
चर्चा करत होती. त्यावर पूर्ण विचार करूनच एखादा निर्णय घेत होती. चुका झाल्याच नाहीत असे नाही पण त्यातून शिकत
गेली. प्रसंगी नव-याला, त्याच्या मताना डावलून निर्णय घेऊ लागली. तिच्या शिकण्याच्या प्रामाणिक तळमळीने तिला
अनेकांनी सहकार्य केले तसा अनेकांनी त्रास हि दिला. जगात चांगली माणसे आहे त यावर तिचा पर्वी
ू पासन
ू च विश्वास होता,
या चांगल्या माणसांनी या प्रवासात तिला साथ दिली. अनेकदा वाटल आपण यात बुडणार पण काडीचा आधार शोधत
तगली. अनेक वादळ अंगावर घेतली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले, ती किना-याला लागूच नये म्हणून अनेकांनी
प्रयत्न केले, सगळ्यात वाईट म्हणजे त्यात तिचे पतीराज हि सामील होते. पुरुषी अहं कार, घरातून होणार शारीरिक मानसिक
छळ, विरोधकांनी केलेली कट कारस्थाने यांना परू
ु न उरताना तिची दमछाक होत होती. पण ती थांबली नाही,
प्रस्थापिंतासमोर वाकली नाही, परु
ु षी सत्तेला आव्हान दे त टिकून राहिली.
तिच्यात आता आमुलाग्र बदल झाला होता. दरम्यानच्या काळात तिने दरू स्थ माध्यमातून राजकारण हाच विषय घेऊन आपले
पदवी आणि पदव्यत्ु तर शिक्षण पर्ण
ू केले होते. तीच व्यक्तिमत्व फुलत होतं, तीच वक्तत्ृ व, तीच कार्य याचा लोकांवर प्रभाव
निर्माण झाला होता. ती आता राजकारणात चांगलीच मुरली होती. आता ती विरोधकांनाच गटांगळ्या खायला लावत होती.
विरोधकांच्या मानसिकतेतून विचार करून त्यांच्या डावाना प्रतिडाव आखून ठे वत होती. नगरपालिकेची पुढची निवडणूक ती
तिच्या कार्यावर आणि स्व-कर्तृत्वावर जिंकली स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे एक स्वप्न पूर्ण झाले. या कार्यकाळात तिने
नगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख केला. नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा विळखा ब-यापैकी सोडवला होता. गोरगरिबांची कामे
पैशाशिवाय होत होती. अनेक चांगल्या योजना राबविल्याने नगरपालिका अनेक परु स्कारांची मानकरी झाली होती. आता
आपण हिचे हवा भरलेले पंख छाटू तर शकत नाही, निदान तिच्या पंखाना आपणच बळ दे तोय असा आभास तरी निर्माण
करू शकतो या विचाराने नवरा परत तिच्या वाटे त आला नाही. आपला राजकारणातील आणि समाजातील आब राखत त्याने
घरच्या धंद्यात जास्त लक्ष घालायला सरु
ु वात केली. नवरा जरी चारचौघात तीच कौतुक करत होता, सन्मान दे त होता तरी
चार भिंतीआडच वास्तव काही बदलेले नव्हते. घरात नवरा तिला कुत्सितपणे बोलण्याची एकही संधी सोडत नव्हता. पण
तिला पर्ण
ू जाणीव होती कि तो आपल्या मार्गातनू आपणहून बाजल ू ा झालाय. आपल्या पेक्षा आपली बायको यशस्वी झाली हे
कोणत्याच नव-याला आवडत नाही. त्यामुळे हा त्याचा राग ती समजून घ्यायची. तापल्या तव्यावर पाणी ओतायचं नसत
नाहीतर तो उगाच तडतडतो हे तिला माहित होत.
तिच्या हुशारीविषयी, ज्ञानाविषयी, तिच्या संयत तितक्याच करारी व्यक्तिमत्वाविषयी लोक आदरपर्व
ू क बोलत होते. खरं तर,
तीच यश आणि सासरची मुळचीच असलेली श्रीमंती तिच्या डोक्यात जायला हवी होती, पण तीचे पाय जमिनीलाच टे कलेले
होते. तिच्या वागण्यात सहजता होती, आपल्या सहका-यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटून उगाच स्वत:चे कौतुक करून घेणे
तिला मुळीच आवडत नसे. उलट आपल्या बरोबर काम करणा-यांना त्यांच्या वकुबा नुसार संधी दे ण, त्यांच्या लहान सहान
कामाचे कौतुक करणे, त्यांना प्रेरणा दे णे, नवनवीन जबाबद-या घ्यायला प्रोत्साहन दे णे यामुळे तिच्या सोबत सामाजिक
बांधिलकीने काम करणा-या लोकांची एक फळीच तयार झाली. दिलेला शब्द खरा करण्याकरिता ती मानमोड मेहनत करी
यामुळे ती सगळ्यांची आवडती “ताई” झाली.(© AG)या सगळ्याची दखल कोणीतरी कुठे तरी घेतय या बद्दल ती पूर्णपणे
अनभिज्ञ होती. जरूर ती एका पक्षाच्या विचारधारे शी सहमत होती पण त्याहूनही जास्त ती लोकांशी बांधील होती. तिच्यात
कर्तुत्व होत, काम करण्याची प्रचंड उर्जा होती, कल्पकता होती, सज
ृ नशीलता होती.संधी मिळाली तर अनेक चांगले बदल
करण्याचे आराखडे कागदावर होते. पण पदासाठी कोणत्याही तडजोडी करायच्या नाहीत या भूमिकेवर ती ठाम होती.
अनपेक्षितपणे तिला पक्षाने माढा मतदारसंघातन
ू आमदारकीला उभ्या राहाल का म्हणन
ू विचारले. चारवेळा ती याच मतदार
संघातून आमदारकीला निवडून आली होती. या कालावधीत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने तिने विधिमंडळ गाजवल होत.
सत्तेत असताना महिला बालकल्याण, विधी न्याय खाते याची मंत्रिपदे मिळाली. या खात्यांचे काम करत असताना
महिलांसाठी अनेक चांगल्या योजना तिने राबविल्या. तिच्या कारकीर्दीत नगण्य समजल्या जाणा-या या खात्यांनी अप्रतिम
कामगिरी करत अनेक पुरस्कार मिळविले.
आधी असलेली ती आणि आताची पोक्त... ती ! मधल्या काळात तिच्यावर झालेल्या अनेक आघातानी आणि अगदी तिला
संपवायला निघालेल्या राजकारणाने तीला खूप काही शिकविले होते. मधल्या काळात आईवडिलांचे छत्र हरपले होते. एक
मुलगा आणि मुलगी होती तिला. मल
ु गी शेंडफ
े ळ बाबाची लाडकी. वडिलांसारखी तापट आणि हट्टी होती. तिचे
महाविद्यालयीन शिक्षण सरु
ु होते. अभ्यासात ठीक होती. सरळमार्गी होती. तापटपणा सोडला तर तिच्या बाबतीत तशी
काहीच चिंता नव्हती. तिच्या मुलाने मात्र अकरावीत असताना टे रेस वरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या
मत्ृ यूचा धक्का होताच पण सगळ्यात वाईट म्हणजे समाज माध्यमानी, वत्ृ तपत्रांनी, दरू दर्शन बातमी पत्रांनी एकमुखाने
तिलाच यासाठी जबाबदार धरलं. मत
ृ ाच्या टाळूवरचे लोणी खाणा-या विरोधकांनी तर याचा फायदा घेत या सगळ्याला तिच्या
राजकीय महत्वाकांक्षाच जबाबदार आहे त असे म्हटले.
वस्तुस्थिती अशी होती कि नवरा होता तापट. मुलाच्या लहानपणी तीच असहाय्य होती., नव–याचा छळ सोसत होती. त्याच्या
विरोधात जाऊ शकत नव्हती. लहानपणी शिस्तीसाठी वडिलांचा भरपूर मार खालेल्ला त्यामुळे मुलगा वडिलांना घाबरायचा.
अभ्यासात हुशार होता पण थोडासा अबोल होता. बिनधास्त काही करायचा आत्मविश्वास त्याने गमावला होता. तिने त्याला
मानोपसाचार तज्ञाकडे नेले होते. त्याची भीती घालवण्याचा आणि आत्मविश्वास वाढवायचा तिने खप
ू प्रयत्न केला.
मायलेकाच तसं छान जमायचं. ती त्याला अनेकदा आत्मविश्र्वास दे ण्यासाठी म्हणे तल
ु ा आयुष्यात जे काही करायचे ते तू
कर मी तुझ्या पाठीशी आहे . अगदी वेळ पडली तर बाबांच्या विरुद्ध जाऊन तुला हवं ते करू दे ईन. पण नाहीच, तो त्या गंडातून
कधीच बाहे र आला नाही. आपल्या विषयी हि त्याला विश्वास वाटू नये हि आपली आई म्हणून हार आहे का? हाच प्रश्न तिला
छळत होता.
हे लिकॉप्टर धूळ उडवीत जमिनीवर विसावले. हातात हार घेऊन आपल्या “ताईंची” वाट पाहणारे कार्यकर्ते स्वागत करण्यासाठी
पुढे धावले. राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान तिला मिळाला होता. मल
ु ाच्या मत्ृ युला पाच वर्ष उलटून सुद्धा
ती अजन
ू ती संभ्रमात होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश खर कि हरलेली आई ......
डॉ.अनघा गोखले
९८५०८९०३८२